धक्कादायक! एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानकडून 513 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

वृत्तसंस्था
रविवार, 14 एप्रिल 2019

- एअर स्ट्राईनंतरही 513 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राईकची कारवाई केली. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून आत्तापर्यंत 513 वेळा शंस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची माहिती 'व्हाइट नाइट कोर'चे जनरल अधिकारी लेफ्टनंट परमजीत सिंह यांनी दिली.

परमजीत सिंह म्हणाले, की ''पाकिस्तानकडून गेल्या दीड महिन्यांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना 100 पेक्षा अधिक मोर्टार आणि तोफांसारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला. विशेषकरुन पाकिस्तानने भारतातील मानवी वस्त्यांना टार्गेट केले. भारतीय लष्करानेही पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले''.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये झालेल्या गोळीबारात दोन मुलींसह चार जवान जखमी झाले. 

Web Title: Pakistan Violated Ceasefire 513 Times After Air Strikes says Indian Army