पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणाऱ्यांना चोप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मार्च 2019

रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे संतप्त जमावाने तरुणांचा पाठलाग करुन दोघांना दोरीने बांधून घालून बेदम चोप दिला आला. तर दोघेजण फरारी झाले. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

बेळगाव - रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच आज कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे संतप्त जमावाने तरुणांचा पाठलाग करुन दोघांना दोरीने बांधून घालून बेदम चोप दिला आला. तर दोघेजण फरारी झाले. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

पुलवामा हल्लानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना काहीजण सोशल मिडीयाव्दारे पाकिस्तानचा जयजयकार करत आहेत. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. रामदुर्ग येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या फेसबुकवर पाकिस्तानची घोषणा शेअर करण्यात आल्याने या प्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना ताजी असताना आज शहरातील कामत गल्ली अचानक चौघे तरुण आले. त्यांनी फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त जवावाने त्यांचा पाठलाग केला. दोघांना पकडण्यात नागरिकांना यश आले तर दोघेजण पसार झाले. संशयिताना दोरीने बांधून घालून जमावाने बेदम चोप दिला. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन दोघांनाही ताब्यात घेतले. संबधीतांची मार्केट पोलीस ठाण्यात चौकशी चालविण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Zindabad creates tense in Belgaum