
India Pakistan War: पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आहे. दरम्यान, पाकिस्ताननं सोडलेलं एक ड्रोन पंजाबच्या फिरोझपूरमधील रहिवासी भागात पडलं आहे. यामुळं एका कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. या कुटुंबाला तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.