शाहरुखला भेटायला पाकिस्तानहून आला; वर्षभर तुरुंगातच बसला! 

Pakistani fan who crossed border illegally last year sent back to his home
Pakistani fan who crossed border illegally last year sent back to his home

अमृतसर : 'मी शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे. आयुष्यात एकदा तरी त्याची भेट घेण्याची माझी इच्छा होती.. पण आता ती इच्छा अधुरीच राहणार आहे आणि मला घरी परतावं लागत आहे..' अशी भावना अब्दुल्ला या 21 वर्षीय तरुणाची आहे. शाहरुखची भेट घेण्याच्या हेतूने अब्दुल्लाने बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला आणि त्याला वर्षभर तुरुंगात खितपत पडावे लागले.

अखेर मानवतेच्या भूमिकेतून भारताने त्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आणि आज (बुधवार) तो पाकिस्तानमध्ये परतला. 

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये वाघा बॉर्डर येथील ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर अब्दुल्ला भारतात घुसला. तो मूळचा स्वात प्रांतामधील रहिवासी आहे. 'मला एकदा तरी भारतात जायचंच होतं. शाहरुखलाही भेटायचं होतं', असे त्याने सुरक्षा रक्षकांना सांगितले. बेकायदेशीररित्या देशात प्रवेश केल्याने त्याला अटक झाली. सुरवातीला त्याला अमृतसरमधील तुरुंगात ठेवण्यात आले. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना अब्दुल्लाची भेट घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर त्याच्या पाकिस्तानमधील कुटुंबाची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्याची आज सुटका झाली. 

प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झालेला भारतीय तंत्रज्ञ हमीद अन्सारी गेली सहा वर्षे तुरुंगात होता. त्याची नुकतीच पाकिस्तानने सुटका केली. आता भारतानेही अब्दुल्लाची सुटका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com