Video: पाक गायिका म्हणते, मोदींना चावतील साप

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

पाकिस्तानची गायिका राबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना साप चावतील असे म्हटले आहे.

नवी दिल्लीः पाकिस्तानची गायिका राबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना साप चावतील असे म्हटले आहे. साप व मगरीसोबत असलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे.

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. राबी पिरजादा हिने 50 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. मोकळ्या खोलीमध्ये साप व मगरीसोबत ती दिसत आहे. काश्मीरवरून मोदींना धमकी देताना ती म्हणते, मोदी तुम्ही काश्मीर मधील नागरिकांना त्रास देत आहात ना. मग पाहा मी तुमच्यासाठी काय तयार केले आहे. माझ्या सोबत असलेले हे माझे मित्र तुम्हाला चावतील अन् तुम्ही मराल. ओके. शिवाय, धमकी देताना तिने अन्य शब्दही वापरले आहेत.

राबी पिरजादा हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी तिला ट्रोल करताना तिच्याबद्दल अपशब्दही वापरले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Pakistani Pop Singer is Threatening PM Narendra Modi With Snakes and Alligators