Indian Navy Video : 'इंडियन नेव्ही जिंदाबाद..'; समुद्री चाच्यांपासून सुटका झाल्यानंतर पाकिस्तानी खलाशांनी मानले भारताचे आभार

सोमाली चाच्यांनी आम्हाला सकाळपासून पकडून ठेवलं होतं.. त्यानंतर भारतीय नौदलाचं जहाज येताना पाहून हे पायरेट्स घाबरले आणि पळून गेले.." असं एका खलाशाने सांगितलं.
Indian Navy Video
Indian Navy Video eSakal

Indian Navy Rescue Video : भारतीय नौदलाने काही दिवसांपूर्वी सोमाली चाच्यांच्या तावडीतून काही खलाशांची सुटका केली होती. या अँटी-पायरेट मोहिमेत कित्येक पाकिस्तानी आणि इराणी खलाशांचा जीव वाचवण्यात आला होता. यानंतर त्या खलाशांनी भारतीय नौदलाचे उस्फूर्त आभार मानले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता नौदलाने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये हे खलाशी आपल्यासोबत झालेली घटना सांगताना दिसत आहेत. "सोमाली चाच्यांनी आम्हाला सकाळपासून पकडून ठेवलं होतं.. त्यानंतर भारतीय नौदलाचं जहाज येताना पाहून हे पायरेट्स घाबरले आणि पळून गेले.." असं एका खलाशाने सांगितलं.

यानंतर या सर्वांनी भारतीय नौदलाचे आभार मानले. "धन्यवाद.. धन्यवाद आमचा जीव वाचवला.." असं ते म्हणताना दिसत आहेत. एका इराणी जहाजातून हे 19 खलाशी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मात्र, दुर्दैवाने ते सोमाली पायरेट्सच्या हाती लागले. त्यावेळी भारताच्या INS सुमित्रा या युद्धनौकेने त्यांचा जीव वाचवला होता. सोमवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणचा झेंडा असलेल्या एका मासेमारी जहाजावर सोमालियन चाच्यांनी ताबा मिळवला होता. जहाजावर असणाऱ्या १९ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना त्यांनी बंधक बनवलं होतं. नौदलाला माहिती मिळाल्यानंतर एसओपीनुसार मोहीम आखण्यात आली. त्यानंतर १९ पाकिस्तान नागरिकांची सुटका करण्यात आली होती. तसेच त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com