भारत पाठवतोय पाकमध्ये दहशतवादी- बाज्वा

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- भारत दहशतवाद्यांना पाठिंबा देत असून पाकिस्तानमध्ये पाठवत आहे, असा आरोप पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाज्वा यांनी केला आहे.

बाज्वा म्हणाले, 'भारतावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. भारत दहशतवाद्यांना पाठिंबा देत असून, त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवत आहे. दहशतवाद्यांच्या दिशेने आमचे सैनिक गोळीबार करतात. परंतु, आम्ही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला जात आहे. एका बाजूने कधी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत नसतो. पाकिस्तानमध्ये दहशतवादी पाठवून भारत जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.'

'भारताने हेरगिरी करण्यासाठी कुलभुषन जाधवला पाकिस्तानमध्ये पाठविले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये बलुचिस्तानमधून त्याला अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्करामधून तो निवृत्त झाल्याचे सांगतो आहे. परंतु, तसे नसून तो हेरगिरी करण्यासाठी आला होता. पाकिस्तानने यादवला पकडले आहे. हे एक उदाहरण आहे, असेही बाज्वा म्हणाले.

Web Title: Pakistan's army chief Qamar Bajwa blames India for his country's terrorist menace