Indian Air Strike: पाकिस्तानचा पलटवार; काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

Indian Air Strike: पाकिस्तानचा पलटवार; काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली- भारतीय हवाईदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याचा तीळपापड झाला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असून भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

तसेच, अखनूर, मेंढर, नौशेरा सेक्टरमध्येही जोरदार गोळीबार चालू असून भारतीय सैन्या जशास तसे उत्तर देत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून मेंढर जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला आहे. एकूणच या भारताने केलेल्या हल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा तीळपापड झाल्यानेच असे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येत आहे.


भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आज दुपारी दिला होता. पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली होती त्यानंतर त्यांच्याकडून रुपरेषा ठरविण्याची शक्यता होती मात्र, त्याआधीच पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले पाहायला मिळाले.

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. आज भारतीय हवाईदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com