पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक; खापर भारताच्या माथी

Pakistans foreign affairs ministry website hacked Pak Blaming India for hacking
Pakistans foreign affairs ministry website hacked Pak Blaming India for hacking

इस्लामाबाद : पाकिस्तानची परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी सांगितल्याप्रमाणे, 'बऱ्याच देशातील लोकांनी आम्हाला सांगितले की आम्ही वेबसाईट ओपन करु शकत नाही आहे.' पाक अधिकाऱ्यांनी भारताकडून हे हॅकींग झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

फैसल यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाइट पाकिस्तानमध्ये कोणत्याही गोंधळाविना कार्यरत आहे. तथापि ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, युनायटेड किंगडम आणि नेदरलँडमधील वेबसाईट वापरकर्त्यांनी साइट ओपन करण्यात अडचण येत असल्याचे कळविले. हॅकर्सचा आम्ही शोध घेत असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे हे भारतीय हॅकर्सचे काम असल्याचे पाकिस्तानतर्फे बोलले जात आहे.

पाकिस्तानातील वर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, 'पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला भारतातून करण्यात आला आहे. आयटी टीमने यावर नियंत्रण मिळवले आहे. सध्या या सायबर हल्ल्यामागील सुत्रधाराचा शोध घेण्याचे काम आयटी टीम करत आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com