पत्रकार बुखारी यांच्या हत्येमागे 'आयएसआय'?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

नवी दिल्ली : 
'रायझिंग काश्‍मीर'चे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय'चा हात असण्याची शक्‍यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याचा दावा 'रिपब्लिक टीव्ही'ने केला आहे. बुखारी यांची हत्या करण्यासाठी 'आयएसआय'ने 'लष्कर-ए-तय्यब्बा' या दहशतवादी संघटनेचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. 

दरम्यान, बुखारी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांची छायाचित्रेही पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. एकूण तीन दहशतवादी 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाले आहेत. 

'रायझिंग काश्‍मीर'चे संपादक शुजात बुखारी यांच्यावर काल (गुरुवार) रात्री गोळीबार झाला. यात बुखारी यांच्यासह त्यांच्या एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. श्रीनगरमधील लाल चौकाच्या जवळपास ही घटना घडली. 

Web Title: Pakistans ISI may have used LeT terrorists to kill Shujaat Bukhari