पाकिस्तानच्या संशयित गुप्तहेरास अटक

file photo
file photo

इटानगर: पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा हेर असल्याच्या संशयावरून निर्मल राय याला अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवरील अंज्वा जिल्ह्यात अटक करण्यात आली, असे लष्करी सूत्रांनी आज (बुधवार) सांगितले.

निर्मल राय हा आसाममधील सदियाचा रहिवासी आहे. नियंत्रण रेषेवरील किबुतु आणि डिचु येथील लष्करी ठाण्यांवर तो हमालाचे काम करीत असे, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक एसबीके सिंह यांनी दिली. त्याला रविवारी (ता. 6) लष्कराने अटक करून नंतर अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांच्या ताब्यात दिले.

राय हा नेपाळी असून, तो 2016 ते 2018 मध्ये दुबईत बर्गरच्या दुकानात काम करीत होता. त्यानंतर तो किबितु येथे आला. संशयित हालचालींमुळे रायवर एक महिन्यापासून लक्ष ठेवण्यात येत होते. तो पाकिस्तानचा संशयित हेर असल्याचे लक्षात आल्याने त्याला अटक करण्यात आली. "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्स' या पाकिस्तानची गुप्तहेर संघटनेच्या दुबईतील म्होरक्‍याकडून त्याला प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय आहे, असे लष्करातर्फे सांगण्यात आले. किबुतु येथील लष्कराची शस्त्रे व तोफांचा साठा ठेवण्याचे ठिकाण, जवानांच्या तैनातीची जागा व परिसराची माहिती, तेथील मूलभूत सोयी याबद्दलची संवेदनशील माहिती तो पाकिस्तानला पुरवित होता, अशी माहिती लष्कराच्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. रायचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com