Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

Pappu Yadav Attack News: पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या शासकीय निवासस्थानी मोठा गोंधळ झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान एका तरुणाने त्यांच्यावर कथितरित्या हल्ला केला.
Pappu Yadav Attack

Pappu Yadav Attack

ESakal

Updated on

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत होते. एक तरुण तिथे आला आणि त्याने गोंधळ सुरू केला. याबाबत खासदार म्हणाले, "एक तरुण पत्रकार परिषदेत चाकू घेऊन आला. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. पण मी घाबरणार नाही. राम मंदिराच्या देणग्यांच्या चोरीच्या आरोपांवरून पप्पू यादव यांनी एका भिक्षूचा वेश धारण करून संसद भवनात आंदोलन केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com