
गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षातील हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांना परमवीरचक्र मिळायला हवे होते, अशी भावना त्यांच्या माता-पित्याने व्यक्त केली आहे.
हैदराबाद - गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षातील हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांना परमवीरचक्र मिळायला हवे होते, अशी भावना त्यांच्या माता-पित्याने व्यक्त केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस १६ बिहार रेजीमेंटमधील कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांना महावीरचक्र मरणोत्तर जाहीर करण्यात आले. त्याविषयी पिता बी. उपेंद्र यांनी सांगितले की, आम्हाला आनंद झाला नाही असे नाही, पण महावीरचक्रमुळे आमचे शंभर टक्के समाधान झालेले नाही.
लाल किल्ल्यावर जे झालं त्याबद्दल माफ करा; शेतकऱ्यांचा मोठा निर्णय
माझ्या मुलाचा आणखी चांगल्या पद्धतीने सन्मान करण्यास वाव होता, कारण आपले कर्तव्य बजावताना त्याने प्रदर्शित केलेले शौर्य पाहता परमवीरचक्रच्या रूपाने सर्वोच्च लष्करी सन्मान त्याला मिळायला हवा होता. त्याच्या पराक्रमामुळे अनेक लोक प्रेरित झाले आहेत, ज्यात संरक्षण दलांत काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या धैर्यामुळे शत्रू देशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वीरपत्नी संतोषी उपजिल्हाधिकारी
उपेंद्र पुढे म्हणाले की, तब्बल २१ वर्षांनी तेलंगणच्या सुपुत्राला महावीरचक्रसारखा सन्मान मिळाला आहे आणि ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. दरम्यान, संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांना तेलंगण सरकारने उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
Edited By - Prashant Patil