
अहमदाबादच्या साबरमतीमध्ये पार्सल स्फोटाची घटना समोर आली आहे. गुजरात उच्च न्यायालयात लिपिक म्हणून काम करणाऱ्या बलदेव सुखाडिया यांना पार्सलच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले. यावेळी पार्सल देण्यासाठी आलेला बलदेवचा भाऊ किरीट सुखडिया आणि गौरव गढवी हे जखमी झाले. या घटनेनं खळबळ उडाली आहे.