बलात्कारांच्या घटनांना पालक जबाबदार! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

बलिया (उत्तर प्रदेश) : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बैरियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता बलात्काराच्या वाढत्या घटनांना युवक-युवतींच्या पालकांना जबाबदार ठरवले आहे. पालक आपल्या मुला-मुलींचे संरक्षण करत नसल्याने अशा घटना घडतात, असे ते म्हणाले. 

सिंह म्हणाले, पालकांना मुलांच्या स्वच्छंदी जीवनावर लगाम घालण्याची गरज आहे. 15 वर्षांखालील मुला-मुलींवर विशेष देखरेख ठेवली गेली पाहिजे. आपल्या पाल्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य असते; मात्र अनेक पालक तसे करण्यात अपयशी ठरत आहेत. ते आपल्या मुला-मुलींना स्वच्छंदी जीवन जगू देतात. हा स्वेच्छाधारी स्वभाव योग्य नसून ते सामाजिक विकृतीचे प्रमुख कारण आहे. पालकांनी आपल्या मुलांना स्वच्छंदी जीवन जगू देण्याचे स्वातंत्र्य देऊ नये. सिंह यांनी तरुण मुला-मुलींच्या मोबाईल वापरण्यासही विरोध दर्शवला. 

सिंह यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले आमदार कुलदीपसिंह सेंगर यांचीही पाठराखण केली होती. अलीकडेच त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शूर्पणखा असेही संबोधले होते. 

Web Title: Parents are responsible for rapes, says BJP MLA Surendra Singh