विरोधकांच्या गोंधळातच राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर

rajyasabha.jpg
rajyasabha.jpg

नवी दिल्ली-  कृषी विधेयकावरुन राज्यसभेत गोंधळ सुरु असतानाच हे विधेयक मंजूर करण्यात आले. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाले. उद्या सकाळी 9 पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. 


कृषी विधेयकावरुन राज्यसभेत गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. विरोधक सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. विरोधकांनी विधेयकाची कागदपत्रे फाडण्याच्या प्रयत्न केला. या गोंधळात उपसभापतीचा माईक तुटला आहे. यावेळी बाजूला असलेल्या मार्शलने विरोधकांना तसे करण्यापासून रोखलं. कृषी विधेयकाला विरोध करत विरोधी पक्षाचे नेते उपसभापतीच्या चेअरपर्यंत पोहोचले होते. विरोधकांनी या प्रस्तावित विधेयकाला 'काळा कायदा' म्हटलं असून याला तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती. 

कृषी विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ; एनडीएकडे नाही बहुमताचा आकडा

केंद्र सरकारकडून आणलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचं सांगत विरोधकांकडून याला विरोध केला होता. या विधेकयावरून एनडीएतील घटक पक्ष अकाली दलाने त्यांच्या एकमेव मंत्र्याचा राजीनामाही दिला आहे. अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी राजीनामा देत विधेयकाला विरोध केला.

तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांवी वेलमध्ये येत सभागृहाच्या नियमांची पुस्तिका राज्यसभा उपसभापती हरिवंश यांना दाखवली. तसेच आज संसदेतील काळा दिवस असल्याचे ते म्हणाले. सभागृहाचा कोणताही नियम पाळण्यात आला नाही, अशी टीका त्यांनी केली. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले की, देशात 70 टक्के लोक शेतीशी संबंधित काम करतात. लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना फक्त शेतकरी काम करत होते', अशाप्रकारे शिवसेनेनेही विधेयकाला विरोध दर्शविला. सुरुवातीला या विधेकाला शिवसेनेने विरोध दर्शविला नव्हता. पण आता या विधेयकाला वाढता विरोध पाहता शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे. ' हे विधेयक मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल आणि देशातील कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याचं सरकार आश्वासन देऊ शकेल का? असा प्रश्नही राऊत यांनी पुढे बोलताना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com