लोकप्रिय पार्ले-जी बिस्किटही आता महागलं! 5 ते 10 टक्क्यांची वाढ | Parle Biscuits Price Hike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parle g

लोकप्रिय पार्ले-जी बिस्किटही आता महागलं! 5 ते 10 टक्क्यांची वाढ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : कोरोनामुळे (coronavirus) आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. त्यातच आता सर्वसामान्यांचं पार्ले-जी (parle-g) कंपनीनेही बिस्किटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. जाणून घ्या सविस्तर..

बिस्किटांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय

पार्ले कंपनीने आपल्या प्रोडक्टवर पाच ते 10 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पार्ले कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं मंगळवारी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, साखर, गहू आणि तेल यासारख्या कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळेच कंपनीने बिस्किटाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय

5 ते 10 टक्क्यांची वाढ
पार्ले कंपनीचा सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्किटाची किंमत आता सहा ते सात टक्क्यांनी महागली आहे. त्यासोबतच कंपनीने टोस्ट आणि केकच्या किंमती अनुक्रमे पाच- दहा आणि 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. बिस्किटांमध्ये पार्ले-जी, हाइड अण्ड सिक आणि krackjack यासारख्या लोकप्रिय पदार्थांचा समावेश आहे.

हेही वाचा: ड्रग्ज कमी प्रमाणात बाळगणे गुन्हा नाही? सरकार विधेयक मांडणार
पार्ले प्रोडक्टचे वरिष्ट अधिकारी मयंक शाह म्हणाले की, आम्ही किंमतीमध्ये पाच ते 10 टक्क्यांची वाढ केली आहे. कंपनीने 20 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे बिस्किट आणि अन्य उत्पादनाच्या किंमती वाढवल्या आहेत. किंमती व्यवस्थित स्थिर ठेवण्यासाठी बिस्किटाच्या पाकिटाचे वजन घटवलं आहे.

हेही वाचा: लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर कोव्हॅक्सिनचे दोन डोस ५० टक्के प्रभावी - Study

loading image
go to top