

Parle-G Biscuits : भारतात असा एक माणूस नसेल ज्याने पार्ले बिस्कीट खाल्लेलं नसेल. लहानपणीच्या सवयीमुळे अनेकांना आजही या बिस्कीटांशिवाय दुसरं बिस्कीट आवडत नाही. मात्र याच पार्लेने आज इंटरनेटवर हवा गरम केलीय.
पार्ले-जी बिस्कीटचा नवीन फ्लेवर बाजारात आलेला आहे. त्यावरुन नेटकरी एकमेकांना भिडत आहेत. त्याचं झालं असं की, माजरा येथील एका ट्विटर युजरने पार्ले-जी बिस्कीटच्या नवीन पॅकेटचा फोटो शेअर केला. बेरी आणि ओट्स फ्लेवर असलेलं हे नवीन बिस्कीट आहे.
हेही वाचाः ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
या नवीन फ्लेवर बिस्कीटचं पॅकिंग आणि रॅपर वेगळं आहे. या युजरने फोटो शेअर करत 'Guys new Parle G just dropped' असं म्हटलं. त्यानंतर ही पोस्ट वाऱ्यासारखी देशभर पसरली.
ट्विटरवर या मुद्द्यावरुन वाद रंगला आहे. कुणी बाजूने तर कुणी चिमटे काढणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टला 150.2K व्ह्यूव्ह मिळाले आहे. ११३ वेळा या पोस्टला रिट्विट केलं आहे.
काही लोकांनी प्रतिक्रिया देतांना सांगितलं की, पार्लेचं हे नवीन बिस्कीट दोन-तीन महिन्यांपूर्वीच आलेलं आहे. तर कुणी याला 'बचपन का साथी' म्हणत आठवणी जाग्या केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.