
नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन व्हर्चुअल (आभासी) पद्धतीने घेतले जाण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे संसदेत सर्व खासदार उपस्थित राहणे शक्य नाही. अशा वेळी जूलैमध्ये सुरु होणारे पावसाळी अधिवेशन व्हर्चुअल किंवा सेमी-व्हर्चुअल पद्धतीने घेण्याचा विचार आहे. या माध्यमातून सदस्य आपल्या सद्य ठिकाणाहून अधिवेशनात सहभागी होऊ शकतात.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उपराष्ट्रपती व्यंकया नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थिती बैठक घेतली. यावेळी संसद भरवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करण्यात आला. राज्यसभा आणि लोकसभेचे अधिवेशन व्हर्चुअल पद्धतीने घेण्याबाबत या बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली आहे.
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
-----------
धक्कादायक! आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
----------
फेक बातम्यांच्या धर्तीवर सरकारच करणार आता फॅक्ट चेक; कसं ते वाचा?
-----------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या निकषांच्या आधारे संसद चालवायची असेल तर लोकसभेमध्ये केवळ 100 सदस्य तर राज्यसभेमध्ये 60 सदस्य बसू शकतात, असं संसद सचिवांनी सांगितलं आहे. लोकसभेमध्ये 545 आणि राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत. त्यामुळे संसद भरवणे अशक्य असल्याचं ते म्हणाले आहेत.
सचिवांकडून सेंटर हॉल किंवा विज्ञान भवनमध्ये संसद भरवण्यावरही विचार झाला आहे. विज्ञान भवनमध्ये पंतप्रधानांचे आणि वेगवेगळ्या मंत्रालयांचे अधिकृत कार्यक्रम ठेवले जातात. याठिकाणी राज्यसभेच्या सदस्यांना बसण्याची व्यवस्था होऊ शकते. पण लोकसभेच्या सर्व सदस्यांना हे भवन सामावून घेऊ शकत नाही. तसेच सेंटर हॉल आणि विज्ञान भवनमध्ये तात्काळ अनुवाद सुविधा उपलब्ध नाही. संसद सदस्यांना त्यांच्या मात्रभाषेत बोलण्याची मुभा आहे. यावेळी अनुवादकाच्या मदतीने त्यांच्या संवादाचा अनुवाद सर्व सदस्यांपर्यत पोहोचवला जातो. मात्र, सेंटर हॉल आणि विज्ञान भवनमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देणे सध्या अशक्य आहे. तसेच सेंटर हॉल वातानुकूलीत नाही. त्यामुळे दिवसभर तेथे बसणे सदस्यांना अवघड जाणार आहे.
ज्या सदस्यांचा सहभाग आवश्यक आहे अशांनाच आमंत्रित करणे हा एक पर्याय असू शकतो. शिवाय, व्हर्चुअल पद्धतीवर संसद सचिवांनी जास्त भर दिला आहे. त्याबरोबर सेमी-व्हर्चुअल म्हणजे ज्यांचा सहभाग आवश्यक आहे, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि उरलेल्यांचा व्हर्चुअल पद्धतीने सहभाग अशा पद्धतींचा विचार होत आहे. त्यामुळे येत्या काळात व्हर्चुअल पद्धतीन संसद भरल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.