अखेर संसदेत नोटाबंदीवर चर्चेला मुहूर्त

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- वारंवार विनंत्या करण्यात आल्यानंतर अखेर लोकसभेत नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा होणार आहे. चर्चेच्या यादीत हा विषय घेण्यात आला आहे. 

या हिवाळी अधिवेशनात सतत कामकाज बंद पडल्यानंतर लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज आज (सोमवारी) सुरू होणार आहे. नोटाबंदीबाबतची चर्चा लोकसभेच्या कामकाजादरम्यान होईल. 
नोटाबंदीच्या निर्णयावर मतदान घ्यावे ही मागणी सकाळी 11.15 वाजेपर्यंत लोकसभेत विरोधकांनी लावून धरली. लोकसभेच्या नियम 193 नुसार मतदानाशिवाय चर्चा करण्याची तरतूद आहे. 

आज राज्यसभेत...
नोटाबंदीबाबत चर्चा
अपंग व्यक्तींचे हक्क विधेयक, 2014
कर कायदे (दुसरी दुरुस्ती) विधेयक, 2016
HIV आणि रोगप्रतिकारशक्तीच्या ऱ्हासाची लक्षणे (प्रतिबंध व नियंत्रण) विधेयक, 2014

आज लोकसभेत...
नोटाबंदीबाबत चर्चा
प्रसूतिसंबंधी लाभ (दुरुस्ती) विधेयक, 2016
नौदल (न्यायाधिकरण आणि समुद्री हद्दीतील दावे) विधेयक, 2016
मानसिक आरोग्य विधेयक, 2016
 
Web Title: Parliament reconvenes after a stormy week to discuss note ban, demonetisation