esakal | अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठक; 33 पक्षांच्या 40 नेत्यांची उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

19 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलीये. 33 पक्षांच्या 40 पेक्षा अधिक नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावलीये.

अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठक; 33 पक्षांच्या 40 नेत्यांची उपस्थिती

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- 19 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलीये. 33 पक्षांच्या 40 पेक्षा अधिक नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावलीये. पावसाळी अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांना महत्व दिलं जावं, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. बैठकी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'सर्व नेत्यांचे आणि विरोधी पक्षांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.' संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. (Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi all party meeting Monsoon session of Parliament pm narendra modi)

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले की, 'चांगली आणि फलदायी चर्चा संसदेत होणे अपेक्षित आहे. संसदेच्या नियमांनुसार आणि प्रक्रियेनुसार उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. ' बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डीएमकेचे तिरुची रिवा उपस्थित होते. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

कोरोना संकटात सुरु होणाऱ्या 19 जुलैपासूनच्या पावसाळी अधिवेशनाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. जवळपास एका महिन्यापर्यंत चालणाऱ्या या मॉन्सून सत्रादरम्यान 20 बैठका होण्याची शक्यता आहेत. सामान्यत: संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होतं आणि स्वातंत्र्यदिनाच्या आधी समाप्त होतं. सत्राच्या दरम्यान संसद परिसरात कोरोनाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचं पालन केलं जाईल. या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात प्रवेश करणाऱ्यांनी कोरोना लशीचा कमीतकमी एक डोस घेतलेला असणे अनिवार्य असणार आहे.

हेही वाचा: ब्राह्मणांना जवळ करण्यासाठी मायावतींचा 'मास्टर प्लॅन'

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी सोनिया गांधींनी कॉंग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची रविवारी बैठक बोलावली आहे. सीमेवर चीनची आक्रमकता, राफेल लढाऊ विमाने खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरण, इंधन दरवाढ, महागाई यासारख्या मुद्द्यांवर संसद कशी गाजवायची याची व्यूहरचना यात ठरेल. सर्वपक्षीय बैठकीनंतर कॉंग्रेसने अन्य विरोधी पक्षांचीही बैठक बोलावली आहे.

loading image