esakal | ब्राह्मण समाजाला जवळ करण्यासाठी मायावतींचा 'मास्टर प्लॅन'
sakal

बोलून बातमी शोधा

Mayawati

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ब्राह्मणांना जवळ करण्यासाठी मायावतींचा 'मास्टर प्लॅन'

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

उत्तर प्रदेश- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिशन 2022 साठी ब्राह्मणांना सोबत जोडण्यासाठी मायावती रणनीती आखताना दिसत आहेत. बसपा ब्राह्मणांचे मंडलीय संमेल्लन आयोजित करणार आहे. याची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांना देण्यात आली आहे. याची सुरुवात 23 जुलैपासून होणार आहे. सतीश चंद्र मिश्रा अयोध्येत रामाचे दर्शन घेतील. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 23 जुलै ते 29 जुलै असे सहा जिल्ह्यात संमेल्लन घेतलं जाईल. (up assembly election 2022 bsp mayawati held brahmins conference ayodhya satish chandra mishra)

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारी करताना दिसत आहेत. बसपा प्रमुख मायावतीही सक्रिय झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी बूथ गठनची जबाबदारी जिल्हाध्यक्षांकडे होती, पण ती आता मुख्य सेक्टर प्रभारिंकडे असणार आहे. मुख्य सेक्टर अधिकारी स्वत: आपल्या प्रभागात जाऊन बूथ गठनचे काम करतील.

हेही वाचा: 'आर्थिक संकटात होतो तेव्हा...' ; राजपाल यादवने सांगितल्या आठवणी

मायावती यांनी बंधुभाव कमेंट्या पुन्हा एकदा सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. बंधुभाव आणि ब्राह्मणांना पक्षासोबत जोडण्याची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्र यांना देण्यात आली आहे. बंधुभाव कमेंटिच्या स्थापनेचे कामही लवकरात लवकर संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2007 मध्ये निवडणुकीत बंधुभाव कमेंटींनी पक्षाच्या वातावरण निर्मितीचे काम केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या कमेटी सक्रिय करण्यास सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: अंगावर बसून पोलिसाची महिलेला मारहाण; सोशल मीडियावर संताप

मायावती ऑगस्टमध्ये घेणार बैठक

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, सेक्टर गठन, बूथ गठन आणि बंधुभाव कमेटीच्या कामाचे परिक्षण मायावती ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात करतील. मुख्य सेक्टर प्रभारिंकडून यासंदर्भातील रिपोर्ट घेतला जाईल. याच्या आधारे पक्ष संघटन किती मजबूत आहे आणि काय सुधारणा करणे आवश्यक आहे यासंदर्भात निर्देश देण्यात येतील. बसपा प्रमुख मायावती सध्या लखनऊमध्ये असून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते तयारी करत आहेत.

loading image