पिस्तूल चालविण्याचे बेळगावात प्रशिक्षण 

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

सांकेतिक भाषेचा वापर 
हत्येसंदर्भात बोलताना गौरी लंकेशचे थेट नाव न घेता सांकेतिक भाषेचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित मराठी, कन्नड व तेलुगू भाषा बोलत होते. त्यांनी सुमारे एक वर्ष टेलिफोन बूथचा वापर केला, अशी माहिती एसआयटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. 

 

बंगळूर : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येची मोहीम संशयितांनी "ऑपरेशन अम्मा' नावाने राबवितानाच बेळगावात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती संशयित परशुराम वाघमारे याने विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत दिली. 

परशुराम वाघमारे कट्टर हिंदुत्ववादी असून, त्याच्या याच बाबीचा नेमका फायदा घेऊन ब्रेनवॉश करण्यात आले. त्याला गौरी लंकेश यांची हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. "हिंदू धर्मावर तुझे प्रेम आहे ना, मग देवानेच तुला ही संधी दिली असल्याचे समज आणि त्याचा उपयोग करून घे. तुझ्या धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना सोडू नकोस. तुला तयार करण्याची जबाबदारी माझी,' असे सांगून एका व्यक्तीने वाघमारे याला गौरी लंकेश यांची हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे त्याच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. 

वाघमारेला बेळगावातील निर्जन प्रदेशात एअरगनने प्रशिक्षण देण्यात आले. 20 दिवसांच्या प्रशिक्षणात सुमारे 500 गोळ्या झाडल्याचे त्याने चौकशीत सांगितले. हत्या करण्यापूर्वी गौरी लंकेश कोण आपणास माहीत नव्हत्या. माझ्या धर्मावर कोणी टीका केलेली मला सहन होत नाही. एक दिवस कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर एका व्यक्‍तीने एका व्यक्तीचा खून करावयाचा असल्याचे सांगितले. सुरवातीला मी नकार दिला, परंतु गौरी लंकेश यांनी आपल्या वृत्तपत्रातून धर्माविरुद्ध केलेले लेखन व भाषणातून केलेली टीका माझ्या दृष्टीस आणून देण्यात आली. त्यानंतर मी त्यासाठी तयार झालो, अशी माहिती वाघमारे याने चौकशीत

सांकेतिक भाषेचा वापर 
हत्येसंदर्भात बोलताना गौरी लंकेशचे थेट नाव न घेता सांकेतिक भाषेचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित मराठी, कन्नड व तेलुगू भाषा बोलत होते. त्यांनी सुमारे एक वर्ष टेलिफोन बूथचा वापर केला, अशी माहिती एसआयटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. 

कर्नाड, पाटील हिटलिस्टवर 
स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी प्रयत्न केल्याबद्दल तत्कालीन पाटबंधारेमंत्री एम. बी. पाटील, खाण व भूविज्ञानमंत्री विनय कुलकर्णी, विचारवंत लेखक गिरीश कर्नाड, सी. एस. द्वारकानाथ, के. एस. भगवान, प्रा. महेशचंद्र गुरू, निजगुणानंद स्वामी यांच्यासह आणखी काही जणांची नावे हिटलिस्टवर आहेत, अशी माहिती परशुराम वाघमारेने एसआयटीला दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: parshuram waghamare get Pistol Training in Belgaum