Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Building Collapsed News: एक धक्कादायक घटना घडली आहे. काम सुरू असताना घराचा काही भाग कोसळला आहे. यात ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
Greater Noida Building Collapsed

Greater Noida Building Collapsed

ESakal

Updated on

ग्रेटर नोएडाच्या राबुपुरा पोलीस स्टेशन परिसरात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. नागला हुकुम सिंह गावात बांधकाम सुरू असलेल्या तीन मजली घराचा कमान कोसळला. घटनास्थळी काम करणारे अकरा कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कमान उघडत असताना हा अपघात झाला. मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com