
‘हा नेता जनतेचा पैसा लुटतो’ असं म्हणत महिलेने पार्थ चॅटर्जीवर फेकली चप्पल
कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील (Teacher Recruitment Scam) पार्थ चॅटर्जीवर (Partha Chatterjee) महिलेने चप्पल फेकल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी महिलेने ‘कॅश किंग’ पार्थ चॅटर्जी यांच्यावर चप्पल फेकली. ‘हा नेता जनतेचा पैसा लुटतो’, असे यावेळी महिला म्हणाली. (Partha Chatterjee Latest News)
याआधी रविवारी पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांनी दावा केला होता की, ईडीच्या छाप्यादरम्यान जप्त केलेले पैसे त्यांचे नव्हते. आपल्या विरोधात कोण षडयंत्र रचत आहे हे येणारा काळच सांगेल असेही ते म्हणाले होते. याआधी पार्थ चॅटर्जीची मदतनीस अर्पिता मुखर्जी हिने ही रोख पार्थ चॅटर्जीची असल्याचे सांगितले होते. या दोघांनीही नकार दिल्यानंतर सापडलेली मालमत्ता कोणाची, हा मोठा प्रश्न केंद्रीय यंत्रणेसमोर आहे.
हेही वाचा: चिंता वाढवणारी बातमी! केरळमध्ये आणखी एकाला मंकीपॉक्सची लागण; ५ वे प्रकरण
कलकत्ता (Kolkata) उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) सरकार प्रायोजित गट-क आणि आणि डी कर्मचाऱ्यांच्या तसेच शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करीत आहे. ईडी (ED) या घोटाळ्यात सामील असलेल्या मनी ट्रेलची चौकशी करीत आहे.
Web Title: Partha Chatterjee Throw Slippers Kolkata Teacher Recruitment Scam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..