उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पक्षांना द्यावी लागणार पेपरमधून माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CEC Sushil Chandra

उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पक्षांना द्यावी लागणार पेपरमधून माहिती

नवी दिल्ली : निवडणुकांमध्ये एखाद्या पक्षातर्फे गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला उमेदवाराची निवड केली गेल्यास त्याबद्दल मतदारांना सर्व माहिती असणे आवश्यक आहे. (Voters should be informed about the credentials of the candidate) त्यामुळे जर एखाद्या पक्षातर्फे निवणुकांमध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला उमेदवार उतरविला गेल्यास संबंधित पक्षांना त्या उमेदवाराची माहिती आणि त्याची निवड का केली याबद्दल सांगावे लागणार आहे. (parties must inform their candidate criminal record says election commission)

एवढेच नव्हे तर, अशा उमेदवारांची (Election Candidate) माहिती संबंधित पक्षांना वृत्तपत्रे, टेलिव्हिजन आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि आयुक्त राजीव कुमार आणि अनूप चंद्रा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तो बोलत होते. (CEC Sushil Chandra Goa election)

पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, ज्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोग सर्व संबंधित राज्यांमध्ये जाऊन आढावा घेण्याचे काम करत आहे. सुशील चंद्र म्हणाले की, “मतदारांना उमेदवाराची सर्व माहिती मिळायला हवी. राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे की नाही याबाबतची माहिती वृत्तपत्र, टीव्ही आणि वेबसाइटद्वारे सांगावी लागणार आहे. (Parties must inform candidate criminal record through newspaper, TVs and website )

जर तसे असेल तर, राजकीय पक्षांना चांगल्या प्रतिमा असलेल्या उमेदवाराऐवजी गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या उमेदवाराची निवड का केली आहे याचे कारण देखील मतदारांना सांगावे लागणार आहे. त्याशिवाय राज्याच्या सीमावर्ती भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कोणताही व्यवहार संशयास्पद वाटल्यास त्याची तत्काळ माहिती देण्याच्या सूचनाही सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत असे चंद्रा यांनी यावेळी स्पष्ट केले.