प्रवाशानेच दिली विमानाचे अपहरण करण्याची धमकी

प्रवाशानेच दिली विमानाचे अपहरण करण्याची धमकी

कोलकाता- एका प्रवाशानेच विमान अपहरण करण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे. कोलकात्यावरून मुंबईला जाणाऱ्या विमानाने तो प्रवाशी प्रवास करणार होता. विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. जेट एअरवेजच्या विमानाने तो मुंबईला जाणार होता. संशयास्पद वर्तन आणि आक्षेपार्ह टिप्पणीसह त्याने सेल्फी काढला होता. विमानाचे अपहरण करुन विमान उडवून देण्याबद्दल तो बोलत होता असे सांगण्यात आले आहे.

वेदान पोद्दार असे अटक करण्यात आलेल्या या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्या संशयास्पद वागणूकीनंतर त्याला मुंबईला जाणाऱ्या 9W472 विमानातून खाली उतरवून सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आक्षेपार्ह टिपण्णीसह तो सेल्फी पाठवत असल्याचे सोबत असणाऱ्या अन्य प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच ही बाब 'केबिन क्रू'च्या लक्षात आणून दिली. या नंतर त्या प्रवाशाला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, त्याने त्याचा मोबईलही लाल कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com