व्हिडिओ कॉल करून तिला काढायला लावले कपडे

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

बंगळूरूः एका कॅब चालकाला मारहाण केल्यानंतर त्याला पत्नीला व्हि़डिओ कॉल करून तिच्या अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले व चौघांनी त्यांच्या मोबाईलवरून नग्न अवस्थेतील छायाचित्रे काढल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे कॅब चालकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बंगळूरूः एका कॅब चालकाला मारहाण केल्यानंतर त्याला पत्नीला व्हि़डिओ कॉल करून तिच्या अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले व चौघांनी त्यांच्या मोबाईलवरून नग्न अवस्थेतील छायाचित्रे काढल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे कॅब चालकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बेंगळुरूमध्ये ओला चालक सोमशेखर यांना शुक्रवारी (ता. 30) रात्री साडे दहाच्या सुमारास बुकिंग आले. घरी जाण्यापूर्वी त्यांनी ही बुकिंग स्वीकारले. चार युवकांनी अडुगोडी येथून डोम्मासांड्रा या 22 किमीच्या मार्गासाठी ही बुकिंग केली होते. डोम्मासांड्रा या ठिकाणाजवळ आल्यानंतर चार युवकांनी थोडे पुढे नेण्याची विनंती केली. पुढे गेल्यानंतर सोमाशेखर यांना चौघांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीनंतर त्यांनी गाडीची चावी काढून घेतली व गाडीचा ताबा घेतला. सोमशेखर यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली. सोमशेखर यांनी 9 हजार रुपये रोख आणि 20 हजार रुपये पेटीएमद्वारे दिले.

सोमशेखरला पुढे अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. व्हिडीओ कॉल सुरू झाल्यानंतर त्यांनी सोमशेखरच्या पत्नीला तिचे सर्व कपडे काढायला सांगितले. पत्नीने नकार दिल्यानंतर सोमशेखरला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून काहीच पर्याय नसल्याने घाबरललेल्या पत्नीने आपले कपडे काढले. यावेळी चौघांनी व्हिडिओ कॉलचे छायाचित्र काढले. यानंतर सोमशेखरला घेऊन ते रामानागरा जिल्ह्यातील चन्नापटना येथील एका लॉजमध्ये गेले. पहाटेच्या सुमारास सोमशेखरने नजर चुकवून सुटका करून घेतली व पोलिस चौकी गाठली. पोलिसांना याबाबती माहिती देऊन गुन्हा दाखल केला.

कॅब कंपनीने या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली असून, चौघांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. कंपनी सोमशेखरच्या पाठिशी असून, त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. पोलिसांना याबाबत लागणारे सर्व सहकार्य करणार असून, चौघांना पकडून देण्यासाठी मदत करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱयांनी सांगितले.

Web Title: Passengers Assault Rob Cab Driver Force Wife To Strip On Video Call