अखेर 'त्या' दोघांना मिळाला पासपोर्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

उत्तर प्रदेश - लखनौ येथील पासपोर्ट ऑफिसरने एका जोडप्याचा पासपोर्ट अर्ज नाकारला असून, हे जोडपे हिंदू मुस्लिम असल्याने त्याने त्यांचा अपमान देखील केला. तसेच या मुस्लिम नवऱ्याला आपला धर्म बदलून घेण्यासही सांगितले. याबाबत या जोडप्याने सुषमा स्वराज यांच्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिल्यानंतर याची त्वरित दखल घेतली आहे. लखनौच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दोषीविरोधात कठोर कारवाई होईल, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान या प्रकरणातील आरोपी पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्रांची बदली करण्यात असून, या जोडप्याला मिळाला आहे.

महोम्मद अनस सिद्दीकी यांचा 2007 मध्ये तन्वी सेठ या हिंदू मुलिशी विवाह झाला. त्यांची एक सहा वर्षाची मुलगी देखील आहे. 19 जून रोजी त्यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यामुसार 20 जून रोजी त्यांची पासपोर्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट ठरली होती. पासपोर्टसाठीच्या मुलाखतीतल ए आणि बी स्टेजसाठी मुलाखत झाल्यानंतर सी स्टेजच्या मुलाखतीच्या वेळेला हा प्रकार घडला. 

सिद्दिकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी यांना मुलाखतीला बोलाविले असता तिने आपण आपले नाव बदलणार नसल्याचे सांगितले. तसेच याबद्दल घरच्यांचीही परवानगी असल्याचे तिने म्हटले. त्यानंतर ऑफिसर विकास मिश्रा यांनी महोम्मद अनस यांना बोलवून त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदू पद्धतिने विवाह करण्याचा सल्ला दिला. असे न केल्यास हा विवाहच ग्राह्य धरला जाणार नाही असेही मिश्रा यांनी म्हटले.

Web Title: Passport Officer Rejects Hindu-Muslim Couple's Application, Asks Man to Convert to Hinduism