
नवी दिल्ली- पतंजली संस्थेने कोरोना विषाणूवरील औषधाची घोषणा करताच वाद सुरु झाले आहेत. उत्तराखंडच्या आयुर्वेद औषध परवाना प्राधिकरणाने पंतजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पतंजलीच्या औषधाला कोरोना विषाणूवरील उपचारासाठी नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणे आणि सर्दी-खोकल्यासाठी परवाना देण्यात आला आहे, असं प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
जगातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय 'या' राज्यात सुरु होणार; वाचा किती..
योगगुरु रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांच्याकडून मंगळवारी कोरोनावरील औषध कोरोनिल याचे लॉन्चिंग करण्यात आले. कोरोनिल औषध कोरोना विषाणूवर 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा रामदेवबाबांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने औषधाच्या जाहीरातीवर बंदी आणली आहे. असे असतानाच बुधवारी पंतजली कंपनीला दुसरा मोठा झटका बसला आहे.
कोरोनाबाधितांना 100 टक्के बरे करणारे औषध आमच्याकडे; तामिळनाडू सरकारचा दावा
उत्तराखंडच्या आयुर्वेद औषध परवाना प्राधिकरणाचे उपनिर्देशक यतेंद्र सिंग रावत यांनी कोरोनिल औषधावर प्रश्न उपस्थित केले आहे. पंतजलीद्वारे कोरोनावरील औषध लॉन्च करण्यात आले आहे हे मला माध्यमांद्वारेच कळत आहे. पंतजलीच्या औषधाला सर्दी-खोकला आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणून परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनिल औषधाला कोरोनावरील औषध म्हणून घोषीत करता येणार नाही, असं रावत म्हणाले आहेत. तसेच प्राधिकरणाकडून पतंजली कंपनीला नोटीस पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सुखदायक! राज्यातील आतापर्यंत एवढे रुग्ण झाले बरे
मंगळवारी पंतजलीकडून कोरोनावरील औषधाची घोषणा झाली होती. त्यानंतर आयुष मंत्रालयाकडून पंतजलीला नोटीस धाडण्यात आली असून औषधाची जाहीरात न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयुष मंत्रालयाकडून परवाना मिळण्याआधीच पतंजलीकडून कोरोनावरील औषध बाजारात आणण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रामदेवबाबांच्या घोषणेबाबतच्या घाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी माध्यमांसमोर कोरोनिल औषधाची घोषणा केली होती. तसेच रामदेवबाबा यांनी कोरोनिल औषधाने 100 टक्के सकारात्मक परिणाम दिल्याचा दावा केला होता. औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या दाव्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. मात्र, पतंजलीला कोरोनावरील औषध म्हणून कोणताही परवाना मिळाला नसल्याचं स्पष्ट होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.