डेंग्यूतून बरे झाल्यानंतर १५ दिवसांनी एकाला म्युकरमायसकोसिसची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

डेंग्यूतून बरे झाल्यानंतर १५ दिवसांनी एकाला म्युकरमायसकोसिसची लागण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : डेंग्यूतून (Dengue) बरे झाल्यानंतर १५ दिवसांनी एका व्यक्तीला म्युकरमायकोसिसने (mucormycosis) ग्रासल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आले असून हा म्युकरमायकोसिसचा दुर्मिळ प्रकार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : 'रझा अकादमीसह अन्य घटकांचा करणार तपास', गृहमंत्र्यांची माहिती

मोहम्मह तालिब, असे रुग्णाचे नाव असून ते ग्रेटर नोएडामधील रहिवासी आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूतून बरे झाल्यावर १५ दिवसानंतर त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील तज्ज्ञांकडे त्यांना दाखवले. हा म्युकरमायकोसिसचा दुर्मिळ प्रकार असल्याचे डॉ. सुरेश सिंह नरुका यांनी सांगितले.

''डेंग्यूनंतर म्युकरमायकोसिसची लागण होणे हे फार दुर्मिळ आहे. कारण मधुमेह किंवा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये हा आजार आढळून येतो. म्युकर नावाच्या बुरशीमुळे होणारा हा प्राणघातक संसर्ग आहे. ही बुरशी नाक, सायनस, डोळा आणि मेंदूच्या निरोगी ऊतींमध्ये इतक्या वेगाने प्रवेश करते की निदान आणि उपचारास विलंब झाल्यास मोठी हानी होऊ शकते'', असे डॉ. सुरेश सिंह यांनी सांगितले.

डेंग्यूतून बरे झाल्यानंतर जर म्युकरची लागण होत असेल तर त्याचे योग्य निदान करणे गरजेचे आहे. नाहीतर रुग्णाची दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असते. कधी-कधी रुग्णाचा डोळा देखील काढावा लागतो, असे डॉ. अतुल अहुजा यांनी सांगितले. संबंधित रुग्ण रुग्णालयात येण्यापूर्वी त्याला डेंग्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या नाकातून रक्त वाहत होते. डेंग्यूमुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्यामुळे त्याला म्युकरमायकोसिसची लागण झाली असावी, असे अपोलो रुग्णालयातील डॉ. निशांत राणा यांनी सांगितले.

,

loading image
go to top