Bihar Congress Workers Clash : दिल्लीवरून आलेल्या काँग्रेसश्रेष्ठींसमोरच पाटणा एअरपोर्टवर कार्यकर्त्यांची जोरदार हाणामारी!

Congress workers clash at Patna Airport: विमानतळावरच काँग्रेस मुर्दाबाद, बिहार प्रभारी मुर्दाबाद अन् काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुर्दाबादच्या दिल्या गेल्या घोषणा
Congress workers clash at Patna Airport in the presence of senior Delhi leaders, causing major chaos and embarrassment for the party.

Congress workers clash at Patna Airport in the presence of senior Delhi leaders, causing major chaos and embarrassment for the party.

esakal

Updated on

Congress workers clash at Patna Airport in the presence of senior leaders : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेते पक्ष बदल करत आहेत, तर राजकीय पक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहेत. दरम्यान,  पाटणा विमानतळावर आज(बुधवार) सांयकाळी दिल्लीवरून आलेल्या काँग्रेसश्रेष्ठींसमोरच काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार हाणामारी झाली.

तिकीटाचे दावेदार असणाऱ्यांच्या समर्थकांनी बिहार काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू, प्रदेश अध्यक्ष राजेश राम आणि विधिमंडळ नेते शकील अहमद खान यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तापले आणि काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते त्यांना भिडले. यावेळी विद्यार्थी नेते मनीष कुमार यांना मारहाण देखील झाली.

दिल्ली बैठक आटोपल्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते पाटण्यात पोहचले होते. यावेळी मोठ्यासंख्येने काँग्रेस नेते, पदाधिकरी आणि कार्यकर्ते विमानतळावर काँग्रेसश्रेष्ठींच्या स्वागतासाठी पोहचले होते. तितक्यात काही जणांनी काँग्रेस मुर्दाबाद, बिहार प्रभारी मुर्दाबाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुर्दाबाद अशा घोषणा देणं सुरू केलं आणि वातावरण चिघळलं.

Congress workers clash at Patna Airport in the presence of senior Delhi leaders, causing major chaos and embarrassment for the party.
Ex-Army Man Own Funeral : ऐकावं ते नवलंच! बाबानं जिवंतपणीच काढली स्वत:ची अंतयात्रा अन् मग स्मशानात पोहचताच...

मुर्दाबादच्या घोषणा देणारे कार्यकर्ते त्यांच्या नेत्याचं तिकीट कापलं गेल्याचं लक्षात आल्याने, संतापले होते. तर त्या ठिकाणी उपस्थित अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांना मुर्दाबादच्या घोषणा जिव्हारी लागल्याने ते देखील आक्रमक झाले आणि मग दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.

Congress workers clash at Patna Airport in the presence of senior Delhi leaders, causing major chaos and embarrassment for the party.
Tej Pratap Yadav on Bihar Assembly Election : अखेर तेजप्रताप यादव यांनी बिहार विधानसभा लढवण्यासाठी मतदारसंघ केला जाहीर!

तर विमानतळावरील हा राडा बघून मग दिल्लीहून आलेल्या काँग्रेसश्रेष्ठींनीही तत्काळ गाडीत बसून तिथून काढता पाय घेणं योग्य समजलं. या गदारोळात अनेक कार्यकर्ते काँग्रेसने पैसे घेऊन तिकीट दिल्याचाही आरोप करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com