Tej Pratap Yadav on Bihar Assembly Election : अखेर तेजप्रताप यादव यांनी बिहार विधानसभा लढवण्यासाठी मतदारसंघ केला जाहीर!

Tej Pratap Yadav announces decision to contest Bihar Assembly: २१ जागांवरही उमेदवार उभे केले आहेत; 'राजद'चं टेन्शन वाढणार?
Tej Pratap Yadav and Tejpratap Yadav bihar Election 2025

Tej Pratap Yadav and Tejpratap Yadav bihar Election 2025

esakal

Updated on

Tej Pratap Yadav to Contest from Mahua Constituency: बिहार निवडणुकीसाठी तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या जनशक्ती जनता दलाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २१ उमेदवारांचा समावेश आहे. तर तेजप्रताप यादव यांनी स्वत:साठी महुआ विधानसभा मतदारसंघ निवडला आहे. या मतदारसंघातून तेजप्रताप यादव बिहार विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

राजदमधून काढून टाकल्यानंतर तेजप्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल या नवीन पक्षाची स्थापना केली. आता ते स्वतः देखील निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या वडील आणि भावाविरोधातच बंडखोरची भूमिका त्यांनी घेतली आहे. तेजप्रताप यांच्या या निर्णया यंदाच्या बिहार निवडणुकीत 'राजद'चे मोठे नुकसान होऊ शकते.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात जागावाटपावरून एकमत झालेले नसताना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मात्र यात आघाडी घेतली आहे. राज्यातील एकूण २४३ जागांपैकी भाजप आणि संयुक्त जनता दलाने प्रत्येकी १०१ जागा लढविण्याचे निश्‍चित केले असून चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षालाही २९ जागा देण्यात आल्या आहेत. भाजपचे बिहार प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी आज ही घोषणा केली.

Tej Pratap Yadav and Tejpratap Yadav bihar Election 2025
Hemant Soren on Bihar Election : हेमंत सोरेन यांनी वाढवलं RJDचं टेन्शन? बिहार निवडणुकीसाठी केली ‘ही’ मोठी मागणी!

तर ‘‘सहा वर्षांपूर्वी अमेठीत राहुल गांधी यांना जसा पराभवाचा मोठा धक्का बसला होता, तसाच धक्का तेजस्वी यादव यांनाही राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनाही बसणार आहे. राघोपूरमध्ये त्यांचा पराभव निश्‍चित आहे,’’ असा दावा जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी शनिवारी केलेला आहे.

Tej Pratap Yadav and Tejpratap Yadav bihar Election 2025
Owaisi on Bihar Election : ओवेसींनी बिहारबाबत घेतला मोठा निर्णय ; तेजस्वी यादव यांना बसणार मोठा दणका?

दरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष यंदाही बिहारमध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा यंदा एमआयएम पाच पट जास्त म्हणजे १०० जागा लढवण्याचा विचारात आहे. त्यामुळे हा एकप्रकारे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण, एमआयएम पक्ष हा विरोधी पक्षांची मतं खेचणार हे स्पष्टच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com