

House Roof Collapses in Patna
Sakal
Patna Roof Collapse Incident : बिहारची राजधानी पाटणाजवळील दानापूर येथे काल रात्री उशिरा एक दुर्दैवी अपघात घडला.घराचे छत कोसळून संपूर्ण कुटुंबच ठार झाले असून परिसरावर शोककळा पसरली आहे. रात्री सगळे गाढ झोपेत असताना अचानक छत कोसळले अन् ढिगाऱ्याखाली सगळेच गाडले गेले. रात्री अचानक मोठा आवाज झाल्याने लोक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरु केले पण दुर्देवाने कुटुंबातील ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.