esakal | इटलीची शरणागती अन पाटण्यात जेवणावळी 
sakal

बोलून बातमी शोधा

इटलीची शरणागती अन पाटण्यात जेवणावळी 

ऐतिहासिक वास्तू आता इतिहासजमा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हॉलंडकालिन रिकॉर्ड रुम, ओल्ड डिस्ट्रिक्ट इंजिनिअर्स ऑफिशस, डिस्ट्रिक्ट बोर्ड पाटणा या इमारती लवकरच बिहार सरकारकडून पाडण्यात येणार आहे.

इटलीची शरणागती अन पाटण्यात जेवणावळी 

sakal_logo
By
पीटीआय

पाटणा - देशातील बहुतांश जिल्हाधिकारी कार्यालय ब्रिटिश राजवटीचे साक्षीदार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू, परिसर, बांधकाम, कागदपत्रातून तत्कालिन काळातील माहिती मिळण्यास हातभार लागतो. यानुसार पाटणा जिल्हाधिकारी कार्यालय आणि दुसरे महायुद्ध यांचे संबंध एका ऐतिहासिक कागदपत्रातून उजेडात आले आहेत. अनेक घटनांचे साक्षीदार असणारे पाटणा जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच इतिहासजमा होणार आहे. 

दुसऱ्या जागतिक महायुद्धात इटलीने शरणागती पत्करल्यानंतर सप्टेंबर १९४३ रोजी आनंद व्यक्त करण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी भवन परिसरात आयोजित भोजन सोहळ्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. शहरात मंदिर, मशिद आणि चर्च येथे प्रार्थना करण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती, असे कागदपत्रातून उघड झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेचे तत्कालिन लष्करप्रमुख जनरल ड्वाइट आयसेनहॉवर यांनी ८ सप्टेंबर १९४३ राजेी इटलीने शरणागती पत्करल्याची घोषणा केली होती. या दोन्ही युद्धात भारतीय जवानांनी मोलाची कामगिरी बजावली. कागदपत्रानुसार, पाटणा जिल्हा युद्ध समितीने या ऐतिहासिक घटनेनिमित्त ११ सप्टेंबर रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पाटणा शहरातील जालान कुटुंबाच्या खासगी संग्राहलयातील माहितीनुसार, इटलीवरील विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी मंदिर, मशिद आणि चर्चमध्ये प्रार्थना केली. त्याचवेळी सार्वजनिक ठिकाणी झेंडा फडकावण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत गरीबांसाठी भोजनाचे आयोजन केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वास्तू इतिहासजमा होणार 
दुर्देवाने ही ऐतिहासिक वास्तू आता इतिहासजमा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हॉलंडकालिन रिकॉर्ड रुम, ओल्ड डिस्ट्रिक्ट इंजिनिअर्स ऑफिशस, डिस्ट्रिक्ट बोर्ड पाटणा या इमारती लवकरच बिहार सरकारकडून पाडण्यात येणार आहे. बिहार उच्च न्यायालयाने या वास्तूंच्या पाडकामास दिलेली स्थगिती नुकतीच हटवली आहे. ऐतिहासिक जिल्हाधिकारी कार्यालयाचे जतन करावे, असे आवाहन इतिहासप्रेमींनी बिहार सरकारला केले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पहिल्या महायुद्ध काळातील पत्र 
जालान कुटुंबातील सध्याचे वारसदार आदित्य जालान (वय ४३) यांच्याकडे दुसरे महायुद्ध आणि पाटणा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासंबंधीचे दुर्मीळ कागदपत्रे आहेत. याशिवाय १० ऑगस्ट १९१७ रोजीचे देखील एक पत्र आहे. हा पहिला महायुद्धाचा काळ आहे. यात परिसरातील पूरग्रस्त भागात पाटणा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भोजन वितरण केल्याचा उल्लेख आहे. हे पत्र पाटण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी जे.एफ. ग्रुनिंग यांनी आर. के. जालान यांना लिहले. जालान हे पाटण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. 

(Edited By - Kalyan Bhalerao)