Patna Road Accident : बिहारची राजधानी पाटणा येथे आज (शनिवार) सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघाताने परिसर हादरला. ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन ८ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचा समावेश असून सर्व जखमींवर तातडीने पाटण्यातील पीएमसीएच रुग्णालयात (Patna PMCH Hospital) उपचार सुरू आहेत.