उपमुख्यमंत्र्यांचा तिसऱ्यांदा घटस्फोट, १३ वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय; पहिले २ संसारही ३-४ वर्षांचेच

Pawan Kalyan Divorce News: पवन कल्याण आणि त्यांची पत्नी अॅना कोनिडेला यांनी लग्नाच्या १३ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पवन कल्याण यांचं हे तिसरं लग्न होतं. त्यांचे आधीचे संसारही फक्त २-३ वर्षेच टिकले होते.
Pawan Kalyan Divorce News

Pawan Kalyan Divorce News

Esakal

Updated on: 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्याची सध्या चर्चा सुरू आहे. पवन कल्याण आणि त्यांची पत्नी अॅना कोनिडेला यांनी लग्नाच्या १३ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दोघांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत आपला निर्णय परस्पर समजुतीने आणि आदराने घेतल्याचं सांगितलं. या निर्णयामागचं नेमकं कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

Loading content, please wait...