काळ्या पैशावरील कर भरा; प्राप्तिकर विभागाचा इशारा

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करणाऱ्या करदात्यांना कराचा पहिला हप्ता भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर असून, या मुदतीत कर न भरल्यास त्यांनी जाहीर केलेला काळा पैसा अवैध ठरविण्यात येईल, असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.

प्राप्ती जाहीर योजना जून ते सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत देशातील काळा पैसाधारकांना तो जाहीर करण्याची सुविधा देण्यात आली होती. या पैशावर त्यांना 45 टक्के कर व दंड भरण्यास सरकारने सांगितले आहे. यातील 25 टक्के कराचा पहिला हप्ता नोव्हेंबर अखेरपर्यंत व दुसरा 25 टक्‍क्‍यांचा हप्ता 31 मार्च 2017 पर्यंत आणि उरलेले 50 टक्के 30 सप्टेंबर 2017 पर्यंत भरण्याची मुभा सरकारने दिली होती. प्राप्ती जाहीर योजनेतील कराचा पहिला हप्ता 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करणे आवश्‍यक आहे. हा हप्ता न भरल्यास जाहीर केलेला काळा पैसा अवैध मानण्यात येईल, असा इशारा देणाऱ्या जाहिराती प्राप्तिकर विभागाने दिल्या आहेत.

सरासरी एक कोटी रुपये उघड
प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत 64 हजार 275 जणांनी 65 हजार 250 कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर केला होता. यातून सरकारला 29 हजार 362 कोटी रुपयांचा कर मिळणार आहे. या योजनेत सरासरी एका व्यक्तीने एक कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर केला आहे.

Web Title: Pay tax on Black Money