नेहरू कुटुंबियांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री पायलला जामिन मंजूर

वृत्तसंस्था
Tuesday, 17 December 2019

बुंदी पोलिसांनी घेतले होते ताब्यात

- नेहरूंच्या पत्नी विषयीही बदनामकारक वक्तव्य

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगी हिला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता तिला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाकडून जामिन मंजूर करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. अटकेनंतर पायलने ट्विटही केले होते. यामध्ये तिने सांगितले, की मला राजस्थान पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मी मोतीलाल नेहरू यांच्याबाबत व्हिडिओ तयार केला होता. त्यावरून मला अटक झाली. पोलिसांनी मला माझ्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. 

ट्विटरवर कलाकारांवर भडकले नेटकरी; म्हणतात, #ShameonBollywood

मोतीलाल नेहरू यांच्याबाबतचा व्हिडिओ तयार झाल्याचे समजल्यानंतर युवक काँग्रेसचे नेते चर्मेश शर्मा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 66 आणि 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बुंदी पोलिसांनी घेतले होते ताब्यात

राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी पायलला ताब्यात घेतले होते. पायलविरोधात नेहरूंचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामिया हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; दखल देण्यास नकार

नेहरूंच्या पत्नी विषयीही बदनामकारक वक्तव्य

पायलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल नेहरू यांचा अपमान केला आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी विषयीही बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे, अशी माहिती बुंदी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक ममता गुप्ता यांनी दिली.

दिल्लीत पोलिसांच्या वेशातील ABVPच्या कार्यकर्त्यांनी ठोकले विद्यार्थ्यांना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Payal Rohatgi Released On Bail After Being Arrested For Making A Video On Motilal Nehru