'पेटीएम'लाच घातला 6.15 लाखांचा गंडा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: देशभरात ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना डिजिटल वॉलेट पेटीएमला दिल्लीतील ग्राहकांनी सहा लाख 15 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीतील कालकाजी, गोविंदपुरी व साकेत येथील 15 ग्राहक आणि पेटीएमची पालक कंपनी "वन 97 कम्युनिकेशन्स'च्या अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने ऑनलाइन विक्री केलेली उत्पादने खराब असल्यास ती ग्राहकांकडून परत घेण्यात येतात. त्यानंतर ती मूळ विक्रेता कंपनीला पाठविण्यात येतात. याचा परतावा ग्राहकाला देण्यात येतो. मात्र, 48 प्रकरणांमध्ये उत्पादन ग्राहकाला यशस्वीपणे पोचल्यानंतरही परतावा देण्यात आल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी पेटीएमची फसवणूक करून परतावा मिळविल्याचे कंपनीने म्हणणे आहे. यात कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

थेट सीबीआयकडे तपास
सर्वसाधारणपणे अशा तक्रारींचा तपास सीबीआय करीत नाही. केंद्र सरकारने शिफारस केल्यानंतर अथवा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर सीबीआय एखाद्या प्रकरणाचा तपास करते. या प्रकरणात मात्र, थेट सीबीआयने तपास हाती घेतला आहे.

Web Title: Paytm cheated of Rs 6.15 lakh by 48 customers