
Bharat Jodo Yatra : मेहबूबा मुफ्तींचाही 'भारत जोडो'ला पाठिंबा; राहुल गांधींसोबत यात्रेत चालणार
Mehbooba Mufti In Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून, समाजाच्या विविध घटकांतील प्रमुख लोकांनी यात देशाच्या अनेक भागांत सहभाग घेतला आहे. या दरम्यान आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनाही या यात्रेत आमंत्रित करण्यात आले आहे.
काश्मीरमधील यात्रेत होणार सामील
काश्मीरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भारत जोडो यात्रेत मी सहभागी होणार असल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी सांगितले. त्यांनी ट्विट केले की, आज मला राहुल गांधी यांच्या काश्मीरमधील भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या अदम्य धाडसाला मी सलाम करते आणि फॅसिस्ट शक्तींना आव्हान देण्याची हिंमत असलेल्या माणसाच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे असे मानते.
हेही वाचा: Video : शिवतारेंनंतर अजित पवार पुन्हा करणार 'करेक्ट कार्यक्रम'; विधानसभेत म्हणाले, 'मनात आणलं तर…'
याआधी अनेक राजकारणी, चित्रपट अभिनेते, खेळाडू, व्यावसायिक, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सामील झाल्या आहेत. ज्या राज्यातून यात्रा निघते त्या राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना त्यात सहभागी होण्यासाठी आगाऊ पत्रे पाठवून त्यांना येण्याचे आवाहन केले जाते.
हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
हेही वाचा: Common Charger Policy : भारतात बंद होणार USB Type-C नसलेल्या स्मार्टफोन्सची विक्री! 'ही' आहे डेडलाईन
यात्रेचा पुढचा मुक्काम उत्तर प्रदेशात
गेल्या सप्टेंबरमध्ये तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा आता दिल्लीत पोहोचली आहे. प्रवासाचा पुढील मुक्काम उत्तर प्रदेश असणार आहे . दिल्लीहून हा प्रवास 3 जानेवारीला पुन्हा सुरू होईल आणि यात्रा उत्तर प्रदेशात दाखल होईल. येथे सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती, आरएलडी नेते जयंत चौधरी, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर आदींना यात्रेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
हेही वाचा: Salman Khan Birthday : भाईजानच्या चाहत्यांवर पोलिसांची 'दबंगगिरी'! सलमानचे 'हात वर', पाहा Video
अनेक नेत्यांनी वैयक्तिक व्यस्ततेमुळे यात्रेत सहभागी होण्यासही नकार दिला आहे. या यात्रेत सहभागी होणार नसल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनीही यात्रेत सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.