Pegasus : तज्ज्ञ समितीचा अहवाल SC त, २५ फेब्रुवारीला सुनावणी

उद्याच या प्रकरणी सुनावणी होणार होती पण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विनंतीनंतर ती पुढे ढकलली
Pegasus
Pegasus

नवी दिल्ली : पेगासिस हेरगिरी (Pegasus Row) प्रकरणाच्या तज्ज्ञ समितीच्या अंतरिम अहवालावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता २५ फेब्रुवारीला पार पडणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehata) यांच्या विनंतीनुसार ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. (Pegasus row SC to hear case peruse expert committee interim report on February 25)

पेगासिस प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं एका समितीची नियुक्ती केली असून या समितीनं आपला अंतिम अहवाल कोर्टाकडं सुपूर्द केला आहे. या अहवालावर २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. पण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपण उद्या इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. ती मान्य करत याची सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणावर २७ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली होती. त्यावेळी कोर्टानं सायबर तज्ज्ञांच्या तीन सदस्यांच्या पॅनलची नियुक्तीचे आदेश दिले होते. या पॅनलच्या माध्यमातून भारतात या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इस्रायली स्पायवेअरचा वापर करण्यात आल्याचा आरोपींची चौकशीची जबाबदारी सोपवली होती.

Pegasus
असं कोणतं आभाळ कोसळणार आहे? वानखेडेंच्या याचिकेवर HC चा संतप्त सवाल

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा तसेच न्या. सूर्यकांत आणि न्या. हेमा कोहली यांच्या खंडपीठानं याप्रकरणी १२ जनहित याचिकांची दखल घेतली आहे. यामध्ये एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि वरिष्ठ पत्रकार एन. राम तसेच शशीकुमार यांच्याद्वारे दाखल जनहित याचिकांचा समावेश आहे.

Pegasus
"दिशाला घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरवू नका, हे महाराष्ट्राला शोभणार नाही"

या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापित समितीमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स, नेटवर्क आणि हार्डवेअरच्या तीन तज्ज्ञांचा सहभाग आहे. पेगासिस स्पायवेअरचा वापर भारतीयांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आला होता. याच्या चौकशीची जबाबदारी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आर. व्ही. रविंद्रन यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांच्या पॅनलमध्ये नवीन कुमार चौधरी, प्रभारन पी. आणि अश्विन अनिल गुमस्ते यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com