Aviation Safety Department : नियम मोडल्यास विमान कंपन्यांना दंड

हवाई सुरक्षा विभागाकडून ‘मसुदा अधिसूचना’ जारी
Penalties for airlines for breaking rules
Penalties for airlines for breaking rules

नवी दिल्ली : मुलकी विमान वाहतूक मंत्रालयाच्या हवाई सुरक्षा विभागाने (बीसीएएस) विमानांच्या, पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विमान सुरक्षा नियम २०२२ ची ‘मसुदा अधिसूचना’ जारी केली आहे. या अंतर्गत, सुरक्षा उपायांचे उल्लंघन केल्यास संबंधित विमानतळ प्राधिकरणे व विमान कंपन्यांकडून एक कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. ही रक्कम यापूर्वी १० लाख रुपये होती.

विमानतळ किंवा विमान कंपनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास किंवा सुरक्षा मंजुरीशिवाय विमान वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाईचे होईल. आगामी हिवाळी अधिवेशनात या मसुद्याला मंजुरी मिळवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मंत्रालयाने नागरिक व संबंधितांकडून याबाबत ३० दिवसांत सूचना मागवल्या आहेत.

सायबर सुरक्षेसाठीही नियम

संसदेत सप्टेंबर २०२० मध्ये विमान दुरुस्ती कायदा (दुरूस्ती) मंजूर करण्यात आला होता. या नवीन अधिसूचनेनुसार देशातल्या विमानतळाचे नकाशे, वास्तुरचना आणि लेआऊट नियमांनुसार नसल्यास संबंधितांना एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी विमान सुरक्षेवर काम करणाऱ्यांसाठी सायबर सुरक्षेबाबतही नियम करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com