'भाजपला आपल्या पंतप्रधानांची लाज वाटायला पाहिजे'

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

रायबरेली- भारतीय जनता पक्षातील लोकांना आपल्या पंतप्रधांनाची लाज वाटायला हवी अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (ता.24) केली. ते रायबरेलीत एका सभेमध्ये बोलत होते. भाजपने अमेठी आणि रायबरेलीला काहीही दिले नाही, उलट जे होतं ते ओरबाडून घेतलं आहे. त्यामुळे इथं आता भाजापाचे लोक आले तर त्यांना सांगा की तुम्हाला पंतप्रधानांची लाज वाटायला हवी असे त्यांनी म्हटले.

राहुल म्हणाले की, रायबरेलीत महामार्ग बनणार होता, मात्र तो बनवला नाही. इथे अनेक सोयीसुविधा बननार असल्याची आश्वासने भाजपकडून देण्यात आली होती. परंतु, पंतप्रधान सरळ-सरळ खोटं बोलत आहेत, ते पहिल्यांदा देवाचं नाव घेतात आणि त्यानंतर खोटं बोलतात. त्यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत की, 15 लाख रुपयेही दिले नाहीत. त्यामुळे आता जर भाजपचे लोक इथं आले तर त्यांना सांगा की, आम्हाला पंतप्रधानांची लाज वाटतेय.

जर केंद्रात काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार आले तर अमेठी आणि रायबरेलीचा विकास होईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर आम्ही मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांचा सन्मान करतो. मात्र, आमच्या विचारधारेसाठी आम्ही लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: People Of Bjp Should Be Ashamed Of Their Prime Minister Says Rahul Gandhi