esakal | लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दारुच्या दुकानाबाहेर रांगा; तळीरामांची मोठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Wine Shop

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दारुच्या दुकानाबाहेर रांगा; तळीरामांची मोठी गर्दी

sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

Delhi lockdown : नवी दिल्ली : देशासह राजधानी दिल्लीतही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. प्रत्येक दिवसाबरोबर कोरोनाचा धोका वाढत चालला आहे, त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक आठवडाभर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. सोमवारी (ता.१९) रात्री १० वाजल्यापासून २६ एप्रिल सकाळी ५ वाजेपर्यंत राजधानीमध्ये कर्फ्यू असणार आहे.

हेही वाचा: काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्यासारखा विचार करत नाहीत - केंद्रीय मंत्री

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर लगेचच लोकांनी दिल्लीतील दारूची विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर मोठी गर्दी केली होती. लॉकडाउनची बातमी समजताच दारु पिण्यास उत्सुक असलेल्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत दुकानांबाहेर भल्या मोठ्या रांगा लावल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्लीच्या खान मार्केटमधील दारुच्या दुकानांबाहेर लोकांनी केलेल्या गर्दीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. दुसरीकडे गोल मार्केटमध्येही असेच चित्र दिसून येत होते.

हेही वाचा: लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा; केंद्राची भूमिका

दरम्यान, दिल्लीत एक आठवड्याच्या लॉकडाउनची घोषणा करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, मोठ्या संकटापासून बचाव करण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताच मार्ग शिल्लक न राहिल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. दिल्लीतील आयसीयूचे बेडही संपले आहेत, औषधांची कमतरता जाणवू लागली आहे.