'जनतेला भाजपचा तिटकारा; आता पर्याय हवा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

 'जनतेला आता भाजपचा तिटकारा आहे. त्यांना सत्तेत भाजप नको आहे. म्हणूनच जनतेला आता एक पर्याय हवा आहे', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नेते आणि जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष अजित जोगी यांनी व्यक्त केली.

रांची : 'जनतेला आता भाजपचा तिटकारा आहे. त्यांना सत्तेत भाजप नको आहे. म्हणूनच जनतेला आता एक पर्याय हवा आहे', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नेते आणि जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष अजित जोगी यांनी व्यक्त केली. छत्तीसगडमध्ये प्रदीर्घ काळ असलेली भाजपची सत्ता हिसकावून घेण्यात काँग्रेसला यश आले. 

छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागांपैकी काँग्रेस 57 जागांवर आघाडीवर आहे. रमणसिंह यांच्या भाजपला केवळ 25 जागांवर आघाडी मिळाली आहे. खुद्द अजित जोगी यांनीही भाजप आणि काँग्रेसविरोधात दंड थोपटले होते. या निवडणुकीत जोगी यांनी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली होती. जोगी मारवाही मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. मात्र, सकाळी 11 पर्यंतच्या कौलांनुसार, जोगी पिछाडीवर आहेत. 

रमणसिंह यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यावर जोगी यांनी भाष्य केले. 'मतमोजणी अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. जनतेला भाजप आता सत्तेमध्ये नको आहे. त्यांना नवा पर्याय हवा आहे. अंतिम निकालापर्यंत वाट पाहा; पण सध्याच्या परिस्थितीवर मी समाधानी आहे', अशी प्रतिक्रिया अजित जोगी यांनी व्यक्त केली.

Web Title: people have had enough of bjp, needs an another option says ajit jogi