आकाशातील 'एलियन' सारखी वस्तू पाहून नागरिकांची पळापळ

वृत्तसंस्था
Monday, 19 October 2020

आकाशामध्ये एलियन सारखी दिसणारी एक वस्तू वाऱयाच्या वेगाने हालचाल करत होती. नागरिकांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना याबाबतची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. ती वस्तू खाली पडल्यानंतर समजले की एलियन नाही तर तो एक फुगा आहे. या फुग्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश): आकाशामध्ये एलियन सारखी दिसणारी एक वस्तू वाऱयाच्या वेगाने हालचाल करत होती. नागरिकांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना याबाबतची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. ती वस्तू खाली पडल्यानंतर समजले की एलियन नाही तर तो एक फुगा आहे. या फुग्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ...

ग्रेटर नोएडामधील स्थानिकांनी आकाशामध्ये एक विचित्र प्रकार दिसला. याबाबतची माहिती अनेकांपर्यंत पोहचली. नागरिकांनी घाबरून पळापळ सुरू केली. आकाशातून एलियन पृथ्वीवर उतरत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासणी केल्यानंतर समोर आले की, आकाशात उडणारा कोणताही एलियन नसून, आयर्न मॅनच्या आकाराचा फूगा आहे. सत्यतेची शहाःनिशा केल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

फेसबुकवरील मैत्रिण निघाली तीन मुलांची आई...

पोलिसांनी सांगितले की, 'दनकौर परिसरात आकाशातून वस्तू खाली येत असल्याची अफवा पसरली. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. परग्रहावरील प्राणी पृथ्वीवर उतरत असल्याचे नागरिकांनी कळवले. काही वेळानंतर ती वस्तू भट्टा परसौल गावाजवळील कालव्याजवळील झुडूपात पडली. फूग्याचा एक भाग कालव्याच्या वाहत्या पाण्याला स्पर्श करत होता, ज्यामुळे फुगा पाण्याच्या प्रवाहाने हलत होता. यामुळे तो एखादा प्राणी असल्याचे नागरिकांना वाटत होते. पण, जवळ जाऊन पाहिल्यानंतर कळले की, तो हवा भरलेला फुगा आहे. फूग्यामध्ये काहीही हानीकारक नव्हते, परंतु, हा फूगा कोणी आकाशात उडविला होता, हे अद्याप कळू शकले नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people misjudge iron man balloon with alien at uttar pradesh