पंजाब, गोव्याला भाजपचे उच्चाटन करायचे आहे: केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा येथील निवडणूक कार्यक्रमांचे स्वागत करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि गोव्यातील जनतेला विद्यमान सरकारचे उच्चाटन करायचे आहे, असे म्हणत दोन्ही राज्यांतील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल म्हणाले, "पंजाबमधील जनतेची अवस्था दीन झाली आहे. त्यांना तेथील भारतीय जनता पक्ष आणि अकालीच्या युतीचे उच्चाटन करायचे आहे. त्यांना पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे प्रामाणिक सरकार हवे आहे. ज्यामुळे त्यांची भ्रष्टाचार आणि अंमलीपदार्थांपासून सुटका होईल. याचप्रमाणे गोव्यामधील जनताही तेथील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला हटविण्यासाठी उतावीळ झाली आहे.'

पंजाब आणि गोवा येथील विधानसभेसाठी 4 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर येथील निवडणूक कार्यक्रमही आज आयोगाने जाहीर केला.

Web Title: People of Punjab, Goa desperate to uproot ruling government : Kejriwal