पेप्सीकोच्या इंद्रा नुयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत इंद्रा नुयी यांनी पेप्सीकोची कामगिरी उंचावली होती. त्यांनी एकाच वेळी पेप्सिकोच्या सीईओ आणि अध्यक्ष असा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. 2019 च्या सुरवातीला त्या अध्यक्ष पद देखील सोडणार आहे.  
 

खाद्य आणि शीतपेयाच्या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी निवृत्त होत आहेत. 62 वर्षांच्या इंद्रा नुयी यांची पेप्सीकोमधील कारकिर्द तब्बल 12 वर्षांची आहे. 3 ऑक्टोबर 2018 ला त्या निवृत्त होत आहेत.

रेमॉन लॅगर्टा इंद्रा नुयी यांच्यानंतर पेप्सीकोची सूत्रे होती घेतील. रेमॉन यांची पेप्सीकोमधील 22 वर्षांची कारकिर्द आहे. गेल्याच वर्षी त्यांना कंपनीच्या अध्यक्षपदावर बढती देण्यात आली होती. आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत इंद्रा नुयी यांनी पेप्सीकोची कामगिरी उंचावली होती. त्यांनी एकाच वेळी पेप्सिकोच्या सीईओ आणि अध्यक्ष असा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. 2019 च्या सुरवातीला त्या अध्यक्ष पद देखील सोडणार आहे.  

कोलासारख्या पेयांपलिकडे जाऊन इंद्रा यांनी पेप्सीकोसाठी नवीन उत्पादनांची बाजारपेठ विकसित केली होती. त्यांनी अनेक नव्या उत्पादनांची सुरवात केली होती. पेप्सीकोला त्यांनी एक भक्कम स्थान निर्माण करून दिले आहे. पेप्सीकोचा उर्वरित अधिकारीवर्ग तसाच राहणार आहे. इंद्रा सतत जगातील टॉप 100 पावरफुल महिलांच्या यादीत सामिल होत आहेत. 2015 साली फॉर्च्युन कंपनीने त्यांना जगातील दुसरी पावरफुल महिला पुरस्काराने सन्मानित केले होते. 'भारतात वाढलेल्या मला परदेशात अशी उच्चपदस्थ संधी मिळेल असे कधीही वाटले नव्हते', असे मत इंद्रा नुयी यांनी व्यक्त केले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Pepsico CEO Indra Nooyi Resigned New CEO Ramon Laguarta Will Take Charge