Perusetus Colossus : ब्लू व्हेल, डायनासॉर यांच्याही पेक्षा महाकाय प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता

निसर्गाने निर्माण केलेलं हे जग रहस्यांनी भरलेलं आहे
Perusetus Colossus
Perusetus Colossus

Perusetus Colossus : निसर्गाने निर्माण केलेलं हे जग रहस्यांनी भरलेलं आहे आणि जेव्हा या रहस्याचे पदर एक एक उलगडतात तेव्हा आपण थक्क होऊन जातो. असंच एक रहस्य सध्या चर्चेत आहे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला गोष्टींबद्दल फारसं माहित नव्हतं. त्यावेळी आपल्याला असं सांगितलं जायचं की डायनासोर हा या पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी होता. आणि आता ब्लू व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी आहे.

पण याहीपेक्षा महकाय प्राणी होता!

शास्त्रज्ञांना पेरूच्या एका वाळवंटात पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्याबद्दल माहिती मिळाली आहे. हा प्राणी दुसरा कोणी नसून एक मासा आहे. ज्याचं वजन जवळपास 340 टन असेल. या वजनानुसार, हा प्राणी ब्लू व्हेलपेक्षा तीनपट जड असावा असा अंदाज तुम्ही लावू शकता. पण हा मासा आपल्या पृथ्वीवरून काही हजार वर्षांपूर्वी नामशेष झाला आहे. ज्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला त्यांनी याला Perusetus colossus असं नाव दिलं आहे.

Perusetus Colossus
Beauty Tips For Women : तरुण दिसायचंय?मग 'हा' उपाय करून बघाच

इतकं वजन असू शकतं का?

अहवालानुसार त्याचे काही अवशेष या वाळवंटात सापडले आहेत. हे पाहून अंदाज बांधता येतो की ते सुमारे 39 दशलक्ष वर्षांपूर्वी इथे समुद्र असावा. जर्मनीतील स्टेट म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री स्टुटगार्ट येथील संशोधक डॉ. एली इमसन यांनी ही माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'शोधादरम्यान आम्हाला या प्राण्याची सुमारे अठरा हाडे सापडली. या प्राण्याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हा एक प्रकारचा व्हेल होता. ज्याला जग बॅसिलोसॉरिड या नावाने ओळखते.

Perusetus Colossus
Driving Tips : Car Dashboard वर असलेल्या लाइट्सचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का?

या सांगाड्यांमधील 13 हाड केवळ कशेरुका (पाठीच्या कण्यातील भाग) आहेत आणि चार बरगड्या आणि एक माकड हाड आहे. जर शास्त्रज्ञांचा अंदाज बरोबर असेल तर लवकरच हा पृथ्वीवरील सर्वात मोठा ज्ञात जीव असेल. त्याच्या वजनाबद्दल शास्त्रज्ञ म्हणतात, जर तुम्हाला त्याचं अचूक वजन जाणून घ्यायचं असेल तर समजून घ्या की तो पृथ्वीवरील 30 हून अधिक आफ्रिकन जंगली हत्तींच्या वजना एवढा असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com